मुंबई

गॅसटंचाईने पुन्हा चुलीवर भिस्त

CD

गॅसटंचाईने पुन्हा चुलीवर भिस्त
जव्हारमध्ये १०० ते २५० रुपयांना विक्री
जव्हार, ता. १९ (बातमीदार)ः इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद ग्रामीण भागांतील जीवनमानावर पडू लागले आहेत. अनेक ठिकाणी सिलिंडर नसल्याने महिलांनी पुन्हा चुलींचा आधार घेतल्याने १०० ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅसजोडणी आहे. मात्र, गॅसटंचाईच्या धास्तीने ग्रामीण भागात महिलांकडून सिमेंट, मातीच्या चुलीची खरेदी केली जात आहे. सद्यःस्थितीत जव्हार तालुक्यात गॅसपुरवठा सुरळीत सुरू आहे; परंतु समाजमाध्यमांवर संभाव्य गॅसटंचाईच्या चर्चा होत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. याच अनुषंगाने मनोर, कासा येथे माती तसेच सिमेंटच्या चुली विक्रीसाठी आल्या आहेत. आठवडा बाजारात शंभर ते २५० रुपयांपर्यंत त्यांची विक्री होत असल्याचे कारागीर विजय रसाळ यांनी सांगितले.
------------------------
सरपणासाठी धडपड
ग्रामीण भागात रानावनातून वाळलेली लाकडे मिळवण्यासाठी महिलांना धडपड करावी लागत आहे. सकाळीच रानात जाऊन अनेक जण सरपणाचे भारे घेऊन येतात. याशिवाय शेणाच्या गोवऱ्या तयार केल्या जात आहेत. पावसाळ्यात सरपण म्हणून त्याचा उपयोग केला जातो.
------------------------------
घरोघरी गॅस आल्याने चुलीचा व्यवसाय कमी झाला होता. मात्र, संभाव्य गॅसटंचाईच्या अनुषंगाने पुन्हा एकदा चुलीची मागणी वाढली आहे. सिमेंटच्या चुली हिवाळ्यात तयार कराव्या लागतात. सद्यःस्थितीत मातीपासून तयार केलेल्या चुलींना मागणी आहे.
- विजय रसाळ, कारागीर, जव्हार
------------------------------------
मातीच्या तयार केलेल्या चुलीला धुराडी काढावी लागते. चुलीला पांढऱ्या मातीने सारवण करावे लागत होते, परंतु आता त्या चुली कालबाह्य झाल्या असल्याने रेडीमेड चुलींना पसंती मिळत आहे.
- वनिता ठाकरे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT