सहा महिन्यांपासून उपासमार
जव्हारमधील शिक्षकाचे वेतन रखडले
जव्हार, ता. १९ (बातमीदार)ः तालुक्यातील शिक्षक सखाराम पवार यांचा पगार कोणताही प्रशासकीय आदेश नसताना सहा महिन्यांपासून रखडला आहे. त्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विविध शिक्षक संघटना तसेच सामाजिक संस्थांनी पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित वेतन अदा करावे, अशी मागणी केली आहे. तसेच विभागीय आयुक्त, कोकण भवन, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे न्याय मागितला आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-----------------------------
गटशिक्षणाधिकारी रजेवर आहेत. याबाबत पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून गट शिक्षणाधिकारी पदभार अन्य व्यक्तीस सोपवून वेतन अदा करण्यात येईल.
- अक्षय पगार, गट विकास अधिकारी, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.