मुंबई

शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा स्थगित

CD

शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा स्थगित
मूलभूत प्रश्नांवर १५ दिवसांत तोडगा काढणार
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार)ः तालुक्यातील मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विक्रमगड तहसील कार्यालयावर काढण्यात येणारा ठाकरे गटाचा बैलगाडी मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. तहसीलदार मयूर चव्हाण यांनी १५ दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अघोषित भारनियमन तसेच कमी दाबाची समस्या यांसह अनेक प्रश्नांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. विशेषतः विक्रमगड-तलवाडा मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली. खराब रस्त्यांमुळे रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणे कठीण होत असल्याने रस्ते तातडीने दुरुस्ती करावे, वीज समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याने विजेची समस्या दूर करावी, घरगुती सिलिंडरचा अनियमित पुरवठा होत असल्याने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने पुरवठा सुरळीत करावा तसेच भात खरेदी केंद्रे सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पाचोर्‍यात भरधाव ट्रकने उडवले इलेक्ट्रिक पोल

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT