मुंबई

वसई तहसीलवर भूमिपुत्रांचा एल्गार

CD

वसई तहसीलवर भूमिपुत्रांचा एल्गार; महसूल प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने

नालासोपारा, ता. १९ ( बातमीदार) : तलाठी, मंडलाधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक भूमिपुत्र संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यासाठी बुधवारी (ता. १८) वसई तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित महसूल प्रश्नांसाठी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. या आंदोलनात मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते.
या आंदोलनात नवी मुंबईचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, आगरी-कोळी युथ फाउंडेशन नवी मुंबई अध्यक्ष नीलेश पाटील, मराठी एकीकरणचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, नेरळ कर्जत आगरी संघटना अध्यक्ष अंकुश शेळके, सुप्रसिद्ध चित्रकार व इतिहास संशोधक मोरेश्वर पाटील, आगरी युवा साहित्यिक सर्वेश तरे, आगरी विकास मंच सायन मुंबईचे अभय थाळी, भिवंडी कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उपसभापती मनीष म्हात्रे, मिरा-भाईंदर आगरी युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे यांसह ठाणे, मुंबई, उरण, नवी मुंबई, कर्जत, मिरा-भाईंदर, भिवंडी येथील स्थानिक भूमिपुत्र, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल विभागाच्या कामकाजातील दिरंगाई, अर्ज प्रलंबित ठेवण्याची पद्धत तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करून, तहसील कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील स्तरावर नागरिकांना ७/१२ उतारा, फेरफार नोंद, वारस नोंद आणि इतर महसूल कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने तहसील दीपक गायकवाड यांना निवेदन सादर केले. यामध्ये प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी तसेच महसूल समाधान शिबिरे गावागावात प्रभावीपणे राबवावीत, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे वसई तालुक्यातील महसूल प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फोटोओळ- वसई : विविध प्रलंबित प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर भूमिपुत्रांचा मोर्चा काढण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Update: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात अवकाळीचा कहर

Jalgaon News : जळगाव बसस्थानकावर स्मार्ट कार्डचा बोजवारा! पहाटेपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना रिकाम्या हाती परतावे लागले

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

SCROLL FOR NEXT