मुंबई

भरधाव ट्रक रस्त्यात अडकला

CD

भरधाव ट्रक रस्त्यात अडकला
महामार्गावरील निकृष्ट कामाचा तलासरीत भांडाफोड
तलासरी, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील साइडपट्ट्यांवरील निकृष्ट काँक्रीटमुळे भरधाव ट्रक अचानक रस्त्यात अडकला होता. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील निकृष्ट कामाचा भांडाफोड झाला आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना गटार खोदण्यात आले होते; मात्र या कामाचा दर्जा चांगला नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अशातच गुरुवारी एका ट्रक साइडपट्टीवरून जात असताना अचानक काँक्रीटमध्ये अडकला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रक अचानक अडकल्याने मागून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. महत्त्वाचे म्हणजे, महामार्गावरील बंद पथदिवे, गटारांसंदर्भात स्थानिक नागरिकांनी स्थानिक पोलिस प्रशासनामार्फत महामार्ग प्राधिकरणाबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे; पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Update: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात अवकाळीचा कहर

Jalgaon News : जळगाव बसस्थानकावर स्मार्ट कार्डचा बोजवारा! पहाटेपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना रिकाम्या हाती परतावे लागले

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

SCROLL FOR NEXT