मुंबई

माकडांच्या उपद्रव्यांमुळे रोहेकर संतप्त

CD

माकडांच्या उपद्रवामुळे रोहेकर संतप्त
उपाययोजनेसाठी वन खात्याला निवेदन
रोहा, ता. १९ (बातमीदार) ः कळसगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या रोहे शहराचा विस्तार वाढत असून, सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे राहत आहे. यामुळे जंगलातील माकडांचा उपद्रवदेखील वाढला आहे. खिडकीवाटे घरात प्रवेश करून घरातील अन्न, कपडे व इतर किमती वस्तू चोरत असल्याने या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरसेवकांनी थेट वन खात्याचे कार्यालय गाठत उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले.
शहरातील छत्रपती संभाजी नगर (बंगळे आळी) मेहेंदळे हायस्कूल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, हनुमान नगर, मंगळवाडी, मोरे आळी, सेवादळ आळी, ब्राह्मण आळी, वरचा मोहल्ला, डोंगरी मोहल्ला आदी भागांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. घरातील किमती वस्तूंचा नाश करणे आणि कपडे व इतर साहित्य चोरण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक विशेषतः महिलावर्ग हैराण झाला आहे. एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जाताना विद्युतवाहिन्या व टीव्ही केबलदेखील तुटत असल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याविषयी स्थानिक नगरसेवक अजित मोरे, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे आदी जणांनी रोह्याचे वनक्षेत्रपाल महेंद्र दबडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी साधकबाधक चर्चा केली व माकडांच्या वाढत्या उपद्रवावर उपाययोजना करण्याची लेखी अर्जाद्वारे मागणी केली.

प्रमुख मागण्या
१ जंगल भागात केवळ ऑक्सिजन देणारे झाडे न लावता फळे देणारे झाडेदेखील लावावी आणि त्यांचे व्यवस्थित संगोपन केले, तर माकड व अन्य प्राणी लोकवस्तीत येणार नाहीत.
२ माकडे घरांवर उड्या मारत असल्यामुळे अनेक जणांचे पत्रे फुटले आहेत. त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.

याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. विशेष मोहीम हाती घेऊन या माकडांना पकडून घनदाट जंगलात सोडण्याची तजवीज केली जाईल. वरिष्ठ अधिकारीवर्गाशी चर्चा करून नुकसानभरपाईविषयी माहिती देण्यात येईल.
- महेंद्र दबडे, वन क्षेत्रपाल, रोहा

फोटो कॅप्शन : वन क्षेत्रपाल महेंद्र दबडे यांना निवेदन देताना नगरसेवक अजित मोरे, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : PNG कनेक्शन लगेच मिळणार, केंद्र सरकारचे राज्यांच्या यंत्रणांना आदेश

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT