मुंबई

गुढीपाडव्याच्या उत्साहात सजली मुंबईनगरी

CD

गुढीपाडव्याच्या उत्साहात सजली मुंबईनगरी
बाइक रॅली, तरुणींचा साज, साहसी खेळांसह लहान मुलांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अशी ओळख असलेल्‍या गुढीपाडव्यानिमित्त मुंबई शहराच्या महत्त्वाच्या परिसरात शोभायात्रा काढल्या गेल्या. मराठी सणांमध्ये ढोल, ताशा, झांजेच्या तालात निघणाऱ्या शोभायात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गिरगाव परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शोभायात्रा पाहण्यासाठी सकाळपासून तरुण मंडळीने गर्दी केली होती. मर्दानी आणि मैदानी साहसी खेळ, दानपट्टा, सोबतच मल्लखांब असे सर्व प्रकार या शोभा यात्रेदरम्यान पाहायला मिळाले. लहान मुलांचे साहसी खेळ, मर्दानी खेळ बघून अनेकांच्या अंगावर काटा आल्याचे चित्र होते. हाच थरार बघण्यासाठी व अनुभवण्यासाठी सकाळपासून गिरगाव, परळ, करीरोड, सात रस्ता हे सर्व महत्त्‍वाच्या परिसरांमध्ये गर्दी होती.
विशेष म्हणजे मुंबईचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त सकाळी ७ वाजल्यापासून तरुणाची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे शोभायात्रेचे वेगळेपण राखत यंदा अनेक मंडळे, पारंपरिक साहसी खेळ खेळणारी प्रशिक्षित मुले-मुली आणि वेगवेगळे मोठे चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. सर्वात प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे महिला, तरुणी आणि पुरुषांची बाइक रॅली. नटलेले चेहरे, आकर्षक साड्या आणि सजवलेल्या बाइक्सनी सर्वांची मने जिंकून घेतली. विशेष आकर्षण ठरले ते स्वराज्य जननी जिजामाता या आखाड्याच्या मुला-मुलींचे. आपल्या साहसी खेळाने या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे आणले.

वाद्य पथकांचे विशेष आकर्षण
यंदाच्या गुढीपाडव्याला विशेष आकर्षण ठरले ते वाद्य पथक. गिरगाव ध्वज पथकातील सदस्यांनी आपल्या वादकाने वातावरणात वेगळा उत्साह निर्माण केला. रांगोळी आणि वादन अशी जुगलंबदी लोकांना पाहायला मिळाली. हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या मुंबईकरांनी मात्र आपली शिस्त राखत गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यासह अनेक मंडळतील २० ते २२ वयोगटातील मुला-मुलींनी दांडपट्टा या साहसी खेळाची प्रात्यक्षिके करून दाखवली. ढोल-ताशाच्या तालात रांगोळीची जुगलबंदी ही अनुभवायला मिळाली. गिरगावातील शोभायात्रेमध्ये नटले-थटलेले चेहरे, डोळ्यांवर गॉगल आणि वेगळाच रुबाब पाहायला मिळाला. डोक्यावर फेट्याचा क्रेझ हा मुला-मुलींमध्ये सारखाच होता.

लहान मुलींची क्रेझ
दीड वर्षाची आश्वी ही आपल्या छोट्या बाइकवर स्वार होऊन नागरिकांची मने जिंकत होती. कोणी द्यानेश्वर, कोणी मुक्ताई, कोणी सरस्वती, शारदा अशा अनेक मुले-मुली तयार होऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते.

बाइक रॅलीतील मुलींचा जलवा
गुढीपाडव्यासाठी निघणाऱ्या बाइक रॅलीमध्ये अनेक मुलामुलींचा समावेश होता. एक ते दीड महिन्यापासून या तरुणी आपली बाइक, वेशभूषा ठरवत असतात. ही बाइक रॅली पाहण्यासाठी मुला-मुलींची गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : अश्लील संदेश पाठवायचा; पवईत तरुणीने परप्रांतीयाला दिला चांगलाच चोप

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT