अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : खानावळ सुरू केल्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या हल्ल्यात ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा संघटन चौक परिसरात राहणारा आशुतोष राय (वय ३३) हा टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने खानावळ सुरू केली होती. याचाच राग मनात धरून ज्ञानेश्वर भुसारे व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप जखमी राय यांनी केला आहे. बुधवारी रात्री राय हे दुचाकीवरून टिफिन देण्यासाठी जात असताना डम्पिंग ग्राउंड ते चिखलोली कोर्टदरम्यान संशयितांनी पूर्वनियोजन करून त्यांना अडवले. त्यानंतर फावड्याच्या दांड्याने व कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राय यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, हात, पाय आणि कमरेवर गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर अंबरनाथमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पूर्वनियोजित हल्ल्याचा दावा
दोन वर्षांपासून काही व्यक्तींकडून टिफिन सर्व्हिस व खानावळ व्यवसाय करू नये, अशा वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राय यांनी केला आहे. नुकतीच सुरू केलेली खानावळ बंद करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी यापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्याची माहिती असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा त्यांचा दावा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.