उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये इतिहास, शौर्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन वैभवाची जिवंत झलक दाखविणारे गडकिल्ले, शस्त्रे आणि प्राचीन नाण्यांचे भव्य ऐतिहासिक प्रदर्शन शहरात भरवण्यात आले आहे. इतिहासप्रेमींसाठी हा एक अनोखा सोहळा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकालीन इतिहासाचे दर्शन घडविणारे शिवकालीन गडकिल्ले, शस्त्रे आणि नाण्यांचे भव्य प्रदर्शन २०, २१ आणि २२ मार्चला उल्हासनगरमध्ये भरवण्यात आले आहे. शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून शिवसेना शहर शाखेच्या वतीने या विशेष ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. विठ्ठलवाडी स्टेशन रोड येथील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समृद्ध वारशाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अभ्यासाची संधी
प्रदर्शनामध्ये शिवकालीन युद्धकौशल्य, गडकिल्ल्यांची अभेद्य रचना आणि त्या काळातील चलनव्यवस्थेचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडविण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याची उभारणी, शस्त्रांमधून रणांगणातील सामर्थ्य आणि नाण्यांमधून त्या काळातील आर्थिक व्यवस्था यांचा अभ्यास करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.