शिक्षणातील समर्पित प्रवासाचा गौरव
डॉ. सुनील खर्डीकर यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञानदानाने आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील खर्डीकर यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नरीमन पॉइट येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोपिकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
डॉ. खर्डीकर यांचा प्रवास केवळ एका कोचिंग क्लासपुरता मर्यादित नसून, ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले आहे. परीक्षेत यशासोबतच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांनी राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम आज या पुरस्काराच्या रूपाने अधोरेखित झाले आहेत.
शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना जबाबदार नागरिक बनवणे होय. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आणि प्रवास सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. सुनील खर्डीकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.