मुंबई

उल्हासनगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात फेरबदल

CD

उल्हासनगर, ता. १९ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांच्या अदल्या-बदल्या केल्या आहेत. या बदलांतर्गत उपअभियंता दीपक ढोले यांच्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 परमेश्वर बुडगे यांच्याकडील उपअभियंता पदाचा कार्यभार काढून त्यांच्याकडे कॅम्प क्रमांक ४ येथील कनिष्ठ अभियंता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच दीपक ढोले यांच्याकडे उत्तर क्षेत्रातील पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी, तर उपअभियंता अशोक घुले यांच्याकडे दक्षिण क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामकाज सुरू करून अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. बदली रद्द करणे किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणताही दबाव आणल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त आव्हाळे यांनी दिला आहे.

आलटून-पालटून जबाबदारी
राज्य सरकारकडून पाणीपुरवठा विभागासाठी अभियंता पदावर प्रतिनियुक्तीने अधिकारी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक अधिकाऱ्यांच्या भरवशावरच विभागाचा कारभार चालवला जात आहे. त्यामुळे प्रभारी कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांना आलटून-पालटून देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मनसैनिकांचे फलक चर्चेत

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT