मुंबई

घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत टायर पंचरवाल्यांची भर

CD

घोडबंदरच्या वाहतूक कोंडीत टायर पंचरवाल्यांची भर
रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहनचालक हैराण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा घोडबंदर रोड सध्या वाढत्या वाहतूक कोंडीने हैराण झाला असून, या समस्येला आता नव्या कारणाची भर पडली आहे. रस्त्याकडेला अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या टायर पंचर दुरुस्ती करणाऱ्यांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र समोर आले आहे.
घोडबंदर रोडवरील विविध ठिकाणी टायर पंचर दुरुस्ती करणारे व्यावसायिक रस्त्यालगतच आपली दुकाने थाटून बसल्याचे दिसून येते. टायर, ट्यूब, हवा भरण्याची साधने आणि इतर साहित्य रस्त्याच्या कडेला पसरवण्यात येत असून, काही ठिकाणी हे अतिक्रमण तब्बल १० ते १२ फूटांपर्यंत वाढले आहे. बांबू किंवा काठ्यांच्या साहाय्याने ट्यूब टांगून ठेवण्याची पद्धतही सर्रास दिसून येते. परिणामी, रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे समोर आले आहेत. दरम्यान, या समस्येकडे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अपघाताची भीती
आधीच वाहनांच्या प्रचंड गर्दीने त्रस्त असलेल्या या मार्गावर अशा अतिक्रमणामुळे कोंडी अधिक तीव्र होत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे किरकोळ अपघातांची शक्यता देखील वाढली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक वाहनचालकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घोडबंदर रोडवर वाहतूक आधीच संथ असते. त्यात रस्त्यावरच पसरलेला हा व्यवसाय आमच्यासाठी मोठी अडचण ठरतो, अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Update: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात अवकाळीचा कहर

Jalgaon News : जळगाव बसस्थानकावर स्मार्ट कार्डचा बोजवारा! पहाटेपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना रिकाम्या हाती परतावे लागले

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

SCROLL FOR NEXT