मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित पाली भवनाचे बाधकाम पूर्ण करा

CD

मुंबई विद्यापीठातील स्वतंत्र पाली भवनचे बांधकाम पूर्ण करा
राजकुमार बडोले यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई विद्यापीठाच्या संकुलात स्वतंत्र पाली भवनच्या प्रलंबित बांधकामाचा प्रश्न आमदार राजकुमार बडोले यांनी
लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. यासाठी न्याय आणि रास्त मागणी करणाऱ्या भंतेंवर विद्यापीठ प्रशासनाने अन्यायपूर्वक कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला.
२१ ऑगस्ट २०२५ पासून भंते विमान्सा यांनी पाली भाषेच्या संवर्धनासाठी अनुदान, स्वतंत्र भवन निर्मिती आणि खेडोपाड्यातून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आण्णाभाऊ साठे वसतिगृहाचे नूतनीकरण करण्याची रास्त मागणी केली आहे. मात्र आंदोलनादरम्यान विद्यापीठ परिसरात त्यांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाली. आंदोलकांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला. कोणतीही नोटीस न देता कायदेशीर प्रक्रिया न पाळता भंते विमान्सा यांचा पीएचडीचा प्रवेश रद्द केला. त्यांचे सामान, पुस्तके वसतिगृहाच्या बाहेर फेकून खोली सील केली. विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांकडे खोट्या तक्रारी केल्याचा आरोपही बडोले यांनी केला.

चौकशीची मागणी
केंद्रीय अल्पसंख्याक विभागाने मंजूर केलेला निधी पाली विभागाच्या विकासासाठी योग्य प्रकारे वापरला जावा. तो निधी परत गेल्यास याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पाली विभागाला स्वतंत्र भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी राजकुमार बडोले यांनी केली.

भंते विमान्सा यांच्या मागण्या अत्यंत छोट्या आणि रास्त आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याऐवजी आंदोलकांना हुसकावणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
- राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : अश्लील संदेश पाठवायचा; पवईत तरुणीने परप्रांतीयाला दिला चांगलाच चोप

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT