मुंबई

सानपाड्याच्या विकासासाठी नागरी सुविधा देण्याची मागणी

CD

सानपाड्याच्या विकासासाठी नागरी सुविधा देण्याची मागणी
नेरूळ, ता. १९ (बातमीदार)ः सानपाडा विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी सहकाऱ्यांसमवेत नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांची भेट घेऊन विविध नागरी समस्या व विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत सानपाडा विभागाच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधा, शिक्षण, क्रीडा व नागरी सुविधा याबाबत महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी मनपा शाळांना सेमी-इंग्लिश/इंग्लिश बोर्ड शिक्षण प्रणाली लागू करण्याची मागणी करण्यात आली. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार, इंग्रजी माध्यमासह आधुनिक शिक्षण उपलब्ध होणे आवश्यक असून, यामुळे गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे शिक्षण मिळून त्यांचे भविष्य अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
सानपाडा सेक्टर ४ येथील रिकाम्या मोकळ्या मैदानाची झालेली दुरवस्था लक्षात आणून देत ते मैदान तत्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या उपयोगासाठी सुस्थितीत करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः विभागात सार्वजनिक स्वरूपाची सुसज्ज व्यायामशाळा तसेच सभामंडप उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
कचरे यांनी केलेल्या मागण्यांसदर्भात महापौर सुजाता पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन योग्य अभ्यास करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नीलेश सामोळी, तुषार बोबे, सुनीता निकम, खेळाडू सागर गाडे, प्रतीक भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
चौकट
निवेदनाद्वारे केलेल्या विविध मागण्या
अर्थसंकल्पात नवीन जलसाठा (पाणी टाकी) उभारणीचा प्रस्ताव
सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे
वाशी–मुंबईदरम्यान जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव
सीसीसी व सिडको वसाहती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT