दादरमध्ये चिमुकल्यांनी उभारली ‘शिक्षणाची गुढी’
प्रभादेवी, ता. १९ (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने दादरमध्ये चिमुकल्यांनी ‘शिक्षणाची गुढी’ उभारून नववर्षात शिक्षणात भरघोस यश मिळावे, अशी गर्जना केली. पारंपरिक पेहरावात नटलेल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत कार्यक्रमाला रंगत आणली.
दादरमधील खेडगल्ली येथे एक्स्टेंडर्ज नर्सरी शाळेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. लहान वयातच मुलांना सण-परंपरांची ओळख व्हावी आणि आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी शाळेच्या परिसरातून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. पालकांनी लेझीम सादर करत रॅलीत रंग भरला, तर मुलांनी वाद्य वाजवत विविध वेशभूषांमधून आपली कला सादर केली. कार्यक्रमाला एक्स्टेंडर्ज प्री-स्कूलच्या संचालिका प्रीती पाटील तसेच शिक्षिका रूपाली कांबळी, संजना जैन आणि समृद्धी पाटील उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.