मुंबई

भारत प्लास्टिक उत्पादनांची निर्यात चार पटीने वाढवणार

CD

प्लॅस्टिक उत्पादनांची निर्यात वाढवणार
ऑल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : भारताचा प्लॅस्टिक उद्योग जागतिक व्यापारात निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असून, पुढील काही वर्षांत प्लॅस्टिकच्या तयार उत्पादनांची निर्यात चारपट वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनाला अनुसरून ऑल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयपीएमए)ने भारताला प्लॅस्टिक तयार उत्पादनांचे अव्वल जागतिक केंद्र बनवण्यासाठी एक धोरणात्मक आराखडा तयार केला आहे.
देशाताली प्लॅस्टिक उद्योगाला चालना देण्यासाठी ‘एआयपीएमए’ आयोजित केलेले ‘प्लॅस्टिवर्ल्ड २०२६’ हे प्रदर्शन भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. यामुळे प्लॅस्टिकच्या तयार उत्पादनांसाठी भारताची जागतिक स्रोत केंद्र म्हणून असलेले स्थान अधिक बळकट होणार आहे. प्लॅस्टिवर्ल्ड व्यापारासाठीचे व्यासपीठ तर आहेच, पण त्याचबरोबर लाखो ‘एमएसएमई’ना सक्षम करण्याची, देशात रोजगारनिर्मिती वाढवण्याची आणि भारताला प्लॅस्टिक तयार उत्पादनांचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याची प्रक्रिया आहे, असे ‘एआयपीएमए’चे अध्यक्ष सुनील शहा यांनी स्पष्ट केले आहे. जागतिक स्तरावर प्लॅस्टिकच्या तयार उत्पादनांचा व्यापार सुमारे १.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका असल्याचा अंदाज आहे. सध्या भारताची निर्यात सुमारे १२.५ अब्ज डॉलर इतकी असून, ती जागतिक बाजारपेठेतील एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. भारताचा प्लॅस्टिक उद्योग प्रामुख्याने एमएसएमईवर अवलंबून असून, देशभरात ९४,००० हून अधिक उत्पादन कारखाने कार्यरत आहेत. सध्या या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा एकूण सुमारे ९० लाख लोकांना रोजगार मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मनसैनिकांचे फलक चर्चेत

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT