प्रत्येक घरावर आनंद व विकासाची गुढी : उपमुख्यमंत्री शिंदे
आनंद आश्रमात पारंपरिक पद्धतीने गुढीपूजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाण्यात पारंपरिक स्वागत शोभायात्रेत सहभागी होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत सहभागी होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासाचा संकल्प व्यक्त केला. “महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंद, प्रगती आणि विकासाची गुढी उभारली जावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित ही भव्य शोभायात्रा ठाणेकरांच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरली. ही केवळ सणापुरती मर्यादित नसून स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारा हा उत्सव असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. तसेच, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत सांस्कृतिक ऐक्य दृढ करणारा हा सोहळा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, टेंभी नाका येथील आनंद आश्रमातही गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या वेळी हेमंत पवार, विलास जोशी, पवन कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.