मुंबई

आमदार नरेंद्र मेहतांकडून न्यायालयाची बिनशर्त माफी

CD

आमदार नरेंद्र मेहता यांची न्यायालयात बिनशर्त माफी

उमराव इन्स्टिट्यूट बदनामी प्रकरण; याचिका निकाली

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : मिरा रोड येथील उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च बदनामी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. तसेच भविष्यात कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा पोस्ट न करण्याचे शपथपत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने संबंधित याचिका निकाली काढली आहे.

उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या संस्थेमार्फत मिरा रोड येथे रुग्णालय चालवले जाते. या रुग्णालयासंदर्भात नरेंद्र मेहता यांनी काही वक्तव्ये केली होती. या वक्तव्यांमुळे संस्थेची बदनामी झाल्याचा दावा करत संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने मेहता यांना संस्थेविरोधात कोणतेही वक्तव्य करणे किंवा समाजमाध्यमांवर संबंधित चित्रफिती पोस्ट करण्यास मनाई केली होती. मात्र, या आदेशानंतरही मेहता यांनी संस्थेविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे सांगत संस्थेने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मेहता यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागत, भविष्यात संस्थेविरोधात कोणतेही वक्तव्य किंवा पोस्ट करणार नसल्याचे शपथपत्र सादर केले. यानंतर न्यायालयाने संबंधित याचिका निकाली काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Solapur News : माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT