मुंबई

महासभेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त

CD

महासभेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी (ता. २०) होणाऱ्या महासभेसाठी प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सभांमध्ये झालेले वाद, धक्काबुक्की आणि नगरसेवकांच्या वाहनांत सापडलेली हॉकी स्टिक्स व दांडकी यांसारखी हत्यारे लक्षात घेऊन हा खबरदारीचा उपाय योजला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिनव गोयल आणि एसीपी कल्याणजी घेटे यांची बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यालय व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सोमवारी झालेल्या पहिल्या महासभेतील तपासणीवर नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि सचिन पोटे यांनी आक्षेप घेतला होता; मात्र कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि महासभा सुरळीत पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त कायम ठेवला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

SCROLL FOR NEXT