मुंबई

पनवेल महापालिकेत सभापतींची निवड

CD

पनवेल महापालिकेत सभापतींची निवड
बबन मुकादम स्थायी समितीचे, तर ममता म्हात्रे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती
पनवेल, ता.१९ (बातमीदार ) पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी समिती सभापतीपदी बबन नामदेव मुकादम तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ममता प्रितम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित विशेष सभेत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रणजित यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे) होते. यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे तसेच महापालिका सचिव नानासाहेब कामठे उपस्थित होते. दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड बिनविरोध झाली.
यानंतर पीठासीन अधिकारी रणजित यादव यांनी अधिकृत घोषणा करत बबन मुकादम आणि ममता म्हात्रे यांच्या निवडीची घोषणा केली. दोन्ही सभापतींची ही निवड एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

SCROLL FOR NEXT