मुंबई

पेण येथे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा

CD

पेण येथे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा
पेण, ता. १९ (वार्ताहर) : ‘तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा’ या उद्देशाने प्रेरित झालेल्या जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संप्रदायातर्फे गुढीपाडव्यानिमित्त पेण येथे शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत हजारो अनुयायांनी सहभागी होऊन हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देत जनजागृती केली.
या यात्रेत सहभागी सर्व भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाला विशेष रंगत आणली. यामध्ये महिला कलशधारी, भगवे ध्वजधारी यांनी टाळ-मृदंग वाजवत हरिनामाचा गजर केला. विविध नृत्यप्रकार आणि सामाजिक विषयांवरील देखावे हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. या वेळी ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले. या यात्रेत पेण, पनवेल, सुधागड, पाली, रोहा, अलिबाग या तालुक्यांतील सर्व वयोगटांतील तरुण, तरुणी, पुरुष, महिला सहभागी झाले होते. विशेष म्हणजे रस्त्याच्या एका बाजूने एका रेषेत ताल-लयबद्ध पद्धतीने भजनांच्या गजरात व ढोल-ताशांच्या निनादात शिस्तबद्ध ही यात्रा पार पडली. याशिवाय इतर अनेक संघटनांनीसुद्धा गुढ्या उभारून शोभायात्रा काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT