मुंबई

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदी उत्साहात

CD

पाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदी उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज अनेकांनी घरखरेदी केली. तसेच विकसकांच्या कार्यालयांत अनेक ठिकाणी बुकिंगबरोबरच चौकशीसाठी गर्दी होती. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.
जागतिक स्तरावरील अस्थिरता आणि सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांमुळे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग होणार का, अशी चिंता रिअल इस्टेट क्षेत्रातून व्यक्त केली जात होती. मात्र, सर्वसामांन्यांसह मध्यमवर्गीय आणि गुंतवणूकदारांनी घर, दुकानांच्या खरेदीला पसंती दिली आहे. त्यामुळे आज रिअल इस्टेटमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण असल्याचे क्रेडाई-एमसीएचआयचे सीओओ केवल वालंबिया यांनी सांगितले. तसेच अनेक विकसकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचा शुभारंभ केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या ज्याला घर घ्यावयाचे आहे, ते मुहूर्त बघताना दिसत नाहीत, आपल्या सोयीच्या वेळी घरखरेदी करीत असल्याने मार्केटचा अंदाज बांधता येत नाही. पूर्वी घरांच्या विक्रीसाठी पाडव्याला विकसक मोठ्या प्रमाणात जाहिरात करत; मात्र आता ते होतानाही दिसत नसल्याचे बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष राम भाटिया यांनी स्पष्ट केले.
...
अखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्यांनी आता आपला मोर्चा देशात मुंबई, ठाणे, नवी मुंबईत, पुणे, बंगळूर, हैदराबाद अशा शहरात गुंतवणूक करण्याकडे वळवला आहे. त्यामुळे आज सर्वत्र रिअल इस्टेटमध्ये सकारात्मक वातावरण होते.
- केवल वालंबिया, सीओओ, क्रेडाई-एमसीएचआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT