मुंबई

मुंबईत उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव

CD

मुंबईत उद्यापासून ग्रंथोत्सव

ग्रंथविक्री, सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा
मुंबई, ता. १९ : उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्रंथ संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि वांद्रे येथील मुंबई उपनगर नॅशनल लायब्ररी आणि मुंबई विलेपार्ले कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथे ग्रंथोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सव व प्रदर्शनाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगरचे संजय बनसोडे यांनी दिली.

विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रात २१ आणि २२ मार्चला हाेणाऱ्या या ग्रंथाेत्सवात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथांची विक्री आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठा नजराणा मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. या वेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्रशिक्षण सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, ग्रंथ संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथ संचालक, ग्रंथालय कोकण विभागाचे प्रशांत पाटील, विभागीय ग्रंथ संचालक संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने होईल. विलेपार्लेतील श्री. वा. फाटक ग्रंथालय ते स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र या मार्गावर ग्रंथदिंडी निघणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्‌घाटन स्थानिक आमदार पराग आळवणी यांच्या हस्ते होणार आहे.
-----
विविध कार्यक्रम
- पहिल्या दिवशी ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा कार्यक्रम शिवशाहीर प्रवीण फणसे आणि टीम रनम मार्तंड शिवशंभू शाहिरी पथक सादर करेल. कलांगणच्या ‘मायलेकरं’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री व साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. या वेळी डॉ. गिरीश ओक, गायिका चैत्राली अभ्यंकर यांचा सहभाग असेल.
- दुसऱ्या दिवशी ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ यात कविता सादर करण्यात येणार आहेत. दुपारी तपस्या नेवे यांचा ‘शब्दवृत्ती जनी ते अश्विनी’, ‘लोककलेच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार-प्रचार’ या विषयावर पंकज पाडाळे यांचे मार्गदर्शन, ‘झोके फुल गाण्यांचे - बालकवीच्या कवितांची अप्रकाशित गाणी’, विकास परांजपे यांचे निवडक साहित्याचे अभिवाचन, असे विविध कार्यक्रम हाेणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : कायदा सोडा, आरोपीला हालहाल करत संपवा, नसरापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संताप; 'फास्टट्रॅक'वरून सरकारचे टोचले कान

Ayodhya: सावधान! रामललाचे दर्शन पास मोफतच; दलालांच्या जाळ्यात अडकू नका! पोलिसांची warning; 'असा' होतोय फसवणुकीचा खेळ

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता

Gold Rate Today: सोनं पुन्हा घसरलं! उच्चांकापासून तब्बल ₹31,000 नी स्वस्त; आज महिन्यातील सर्वात कमी दर, काय आहे भाव?

Gokul Dudh Sangh Crisis : 'गोकुळ'वर प्रशासक नियुक्तीच्या कारवाईने मुश्रीफांना मोठा धक्का; भाजप-महाडिक गटासोबतचा दुरावा नडला!

SCROLL FOR NEXT