मुंबई

अनिल अंबानी यांची आठ तास चौकशी

CD

अनिल अंबानी यांची आठ तास चौकशी
फसवणूकप्रकरणी सीबीआयकडून विचारणा
नवी दिल्ली, ता. १९ : स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित तब्बल दोन हजार ९२९ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उद्योगपती अनिल अंबानी यांची गुरुवारी तब्बल आठ तास चौकशी केली. रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीशी संबंधित याप्रकरणी एसबीआयने अंबानींविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होमफायनान्स लिमिटेडच्या मालमत्तेचा ताबा घेतलेल्या ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे संचालक अमित डांगी यांचीही सात तास चौकशी केली. दरम्यान, अंबानी यांना शुक्रवारीही चौकशीला बोलावले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५मध्ये सुमारे २,९२९ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी अंबानी सकाळी १०.१५ वाजता नवी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात हजर झाले. एसबीआयच्या तक्रारीत रिलायन्स कम्युनिकेशनने चुकीची माहिती देत बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतल्याचे म्हटले आहे. कंपनीवर तब्बल ४० हजार कोटींचे कर्ज असून, त्यापैकी एकट्या एसबीआयची थकबारी २,९२९ कोटींची होती. सीबीआयने अंबानी आणि त्यांच्या कंपनीविरोधात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता.

---
अंबानींनी आरोप फेटाळले
दरम्यान, अनिल अंबानी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्व आरोपांना कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करीत असल्याचे अंबानी यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

सोलापूर जिल्हा परिषदेची २७ मार्च रोजी सभापती निवड! मोहोळ, माढा, माळशिरसला मिळणार संधी?, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरकरांनाही आशा, वाचा...

SCROLL FOR NEXT