मुंबई

डहाणू फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला चालना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.

CD

पर्यटन विकासाला चालना
परिवहनमंत्री सरनाईक यांच्या हस्ते डहाणू फेस्टिव्हलचे उद्‍घाटन
कासा, ता. २० (बातमीदार) ः निसर्गाने नटलेल्या डहाणू परिसरात पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. डहाणू फेस्टिव्हलच्या माध्यमातून या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
डहाणू येथे निसर्गरम्य वातावरणात आयोजित डहाणू फेस्टिव्हलचे उद्‍घाटन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, आमदार विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणू नगर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र माच्छी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार सुनील भुसारा, अमित घोडा, श्रीनिवास वनगा, मनीषा निमकर तसेच राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण आणि इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना सरनाईक यांनी डहाणूसाठी प्रस्तावित १० बसऐवजी आता २५ बस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. तसेच, लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसचे अनावरण होणार असून, पुढील सहा महिन्यांत राज्य परिवहन सेवेत ३,००० नवीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बसपैकी काही बस डहाणूसाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डहाणूसाठी पर्यटन विभागामार्फत सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विचाराधीन असून, आणखी विविध पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT