मुंबई

वीज दराचा निर्णय आठवड्याभरात

CD

वीजदराचा निर्णय आठवडाभरात
‘एमईआरसी’च्या निर्णयाकडे राज्यभरातील ग्राहकांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महावितरणच्या बहुवार्षिक वीजदर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोग (एमईआरसी) आठवडाभरात निर्णय येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला वीजदर कपात करत दिलासा दिल्यानंतर महावितरणच्या पुनर्विचार याचिकेची दखल घेत वीज आयोगाने केलेली वीजदर कपात काहीशी मागे घेतली होती; मात्र आता न्यायालयाच्या निर्देशानुसार येणाऱ्या वीजदर निश्चितीच्या आदेशात वीजदरात वाढ होणार की कपात याकडे राज्यभरातील वीजग्राहकांचे लक्ष लागले आहे.

बहुवार्षिक वीजदर निश्चिती अंतर्गत महावितरणने सादर केलेल्या याचिकेवर मार्च २०२५ मध्ये वीज आयोगाने निर्णय देताना वीजदरात सुमारे १५ टक्के एवढी मोठी कपात केली होती, हे दर १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार होते. दरम्यान, वीज आयोगाच्या वीजदर कपातीच्या निर्णयामुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटणार असल्याचे स्पष्ट करतानाच वीज आयोगाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. त्याची दखल घेत आयोगाने वीजदरातील कपात काही अंशी मागे घेतली. मात्र, त्याला वीजग्राहकांनी उच्च न्यायालयासह, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार वीज आयोगाने आपलाच वीजदर कपातीचा आदेश बदलताना वैधानिक प्रक्रिया पार पाडली नसल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने आयोगाचा आदेश बेकायदेशीर ठरवला होता. सर्वोच्च न्यायालयानेही तेच निरीक्षण नोंदवल्याने वीज आयोगाने महावितरणच्या पुनर्विचार याचिकेवर नव्याने जनसुनावणी घेतली आहे. त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पार पाडतानाच आकडेमोड पूर्ण झाली आहे. त्यामुळे मार्चअखेर नव्याने वीजदराबाबत आदेश येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता दरवाढ होणार की कपात, हे वीजग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT