महानिर्मिती परळीला सौर प्रकल्प उभारणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महानिर्मितीकडून बीड जिल्ह्यातील परळी येथे तब्बल ५० मेगावाॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पात तयार होणारी वीज महापारेषणच्या ग्रीड कनेक्टेड ३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रीडमध्ये टाकली जाणार आहे.
औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागत असल्याने हवेचे प्रदूषण होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून सौर, पवन अशा हरित ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यास चालना दिली जात आहे. त्याचाच भाग म्हणून महानिर्मितीकडून परळी येथे सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याकरिता निविदा मागवल्या आहेत. इच्छुकांना १० एप्रिलपर्यंत आपल्या निविदा सादर करता येणार आहेत. हा सौर प्रकल्प परळी वीज केंद्राच्या रिकाम्या जागेवर उभारला जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.