मुंबई

वेगवान वाऱ्याने चिकू आंबा बागायतदारांचे नुकसान

CD

चिकू, आंबा बागायतदारांचे नुकसान
बोर्डी, ता. २० (बातमीदार) ः वेगवान वाऱ्यामुळे चिकू व आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्या १५ दिवसांपासून शहरातील बाजारपेठा वारंवार बंद राहत असल्यामुळे चिकू वेचण्याच्‍या कामात शितलता आली आहे. फळांचे बाजारभाव पडल्यामुळे बागायतदारांना चिकू वेचण्यासाठी मजुरीदेखील महाग पडत असल्यामुळे जवळजवळ शेतीची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे झाडावरून फळे पिकून पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. गुरुवारी (ता. १९) रात्री सुटलेल्या वेगवान वाऱ्यामुळे चिकू व आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे चालू हंगामात आंब्याचा मोहोरदेखील येण्याची प्रक्रिया खूपच संत गतीने होती. फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत जेमतेम मोहोर आल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत थोड्याफार प्रमाणात फळे आली असतानाच गुरुवारी रात्री तासभर वेगवान वारे सुटल्याने आंबा आणि चिकूची फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अवैध फेरीवाल्यांना आता रेल्वेच्या परिसरात प्रवेश नाही! रेल्वेचे नवीन नियम; नवीन डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली काय आहे? वाचा...

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Zomato Hikes: Zomato चा धक्का! प्लॅटफॉर्म फी पुन्हा वाढली, जेवण ऑर्डर करणं महाग; आता एका ऑर्डरला लागतील एवढे पैसे

SCROLL FOR NEXT