मुंबई

वरवरा राव यांची याचिका फेटाळली

CD

वरवरा राव यांची याचिका फेटाळली
एल्गार परिषद प्रकरण : हैदराबाद येथे स्थायिक होण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेले कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांची मूळ गावी हैदराबाद येथे कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याची मागणी विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे न्यायालयाने मागणी फेटाळताना नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या २०२२ मधील जामीन आदेशानुसार, कनिष्ठ न्यायालयाला राव यांना मुंबईबाहेर प्रवास करण्याची परवानगी देण्याचा अधिकार असला तरीही तो प्रवास तात्पुरत्या स्वरूपाचाच असावा, ही बाब विचारात घेणे आवश्यक असल्याचे त्यांची याचिका फेटाळून लावताना विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी स्पष्ट केले. राव यांच्या दृष्टिकोनातून कारणे कितीही रास्त असली तरीही या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर कायमस्वरूपी जाण्याची परवानगी देण्याचा अधिकार विशेष न्यायालयाला नसल्याचे आदेशात नमूद केले. गेल्या उच्च न्यायालयाने सहआरोपी गौतम नवलखांना दिल्लीला स्थलांतरित होण्याची परवानगी दिल्याचे याचिकेत म्हटले होते; परंतु हा आदेश विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीनुसार घेण्यात आला होता. इतर आरोपींनाही अशाच प्रकारचा दिलासा देण्यासाठी या आदेशाचा आधार घेता येणार नाही, त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने लादलेल्या अटींचा विचार करता, विशेष न्यायालय राव यांना दिलासा देऊ शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

मागणी काय?
वाढते वय आणि आर्थिक अडचणींमुळे, आपल्याला हैदराबाद येथील मूळ गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राव यांनी याचिकेतून केली होती. त्यांना हैदराबादमधील कुटुंबातील सदस्यांकडून भावनिक आणि मानसिक आधाराची गरज असल्याचेही याचिकेत म्हटले होते. हैदराबादमध्ये त्यांचे जावई हे डॉक्टर असून त्यांची नात स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार मिळणे अधिक सोपे जाईल, असा दावाही राव यांनी केला होता. सुमारे ५०,००० रुपयांच्या तुटपुंजा उत्पन्नावर मुंबईसारख्या शहरात वास्तव्य करणे अत्यंत कठीण आहे, त्यांना आपल्या मुलांकडून पैसे उसने घ्यावे लागत असून आपल्या आत्मसन्मानावर व स्वावलंबनावर विपरीत परिणाम होत असल्याचे राव यांनी नमूद केले होते. त्यांच्या अर्जाला ‘एनआयए’ने विरोध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT