गावपाड्यातून चिमण्या भुर्रर्र
वाढती जंगलतोड, प्रदूषणामुळे अस्तित्व धोक्यात
विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) : आधुनिकतेच्या युगात प्रगतीच्या मागे धावताना नकळत निसर्गापासून दूर जात आहोत. वाढती जंगलतोड, प्रदूषण, काँक्रीटच्या वाढत्या बांधकामांमुळे कधीकाळी घरांच्या अंगणात, छपरांवर मुक्तपणे वावरणाऱ्या चिमण्या आता दुर्मिळ झाल्या आहेत.
ग्रामीण भागात पूर्वी पहाटेच्या शांत वातावरणात चिमण्यांचा गोड चिवचिवाट आहे. घराच्या खिडक्या, कौले, झाडांच्या फांद्या, अंगणातील झुडपांमध्ये चिमण्यांची लगबग सुरू आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांच्या अस्तित्वावरच संकट ओढवले आहे. विक्रमगड तालुक्यातील शहर भागाबरोबरच आता ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. सिमेंटच्या घरांमुळे घरटी बांधण्यासाठी जागा उरलेली नाही. तसेच शेती पद्धतीतील बदल, कीटकनाशकांचा वाढता वापर, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती लोप पावत असल्याने अन्नस्रोतही कमी झाले आहेत.
----------------------------
पर्यावरणदृष्ट्या महत्त्व
पर्यावरणासाठी चिमण्या उपयुक्त मानल्या जातात. शेतीतील हानिकारक किडे खातात. यामुळे पर्यावरण स्वच्छ, संतुलित ठेवण्यास मदत होते. सकाळच्या वेळी त्यांचा किलबिलाट वातावरणात चैतन्य निर्माण करतो. त्यामुळे चिमण्या केवळ पक्षी नसून मानव, निसर्गातील सजीव दुवा मानल्या जातात. मात्र सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात चिमणी पुस्तकांमध्येच पाहावा लागेल की काय, अशी भीती पक्षीप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
------------------------
पूर्वी ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी चिमण्यांचा चिवचिवाट नित्याचा होता. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात चिमणी संवर्धनासाठी सामाजिक संस्था, शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
- पप्पू दिघे, पक्षीप्रेमी, विक्रमगड
------------------------
पूर्वी प्रत्येक घरासमोर चिमण्यांसाठी धान्य टाकण्यासाठी सूप टांगलेले असायचे. घराजवळ खळे असायचे, त्यात साठवलेल्या पेंढ्यावरचे दाणे खाण्यासाठी चिमण्या मोठ्या संख्येने यायच्या. मात्र काळानुसार पद्धती बंद झाल्याने गावातून चिमण्यांची वर्दळही कमी झाली.
- अनिल गोविंद, शेतकरी, ओंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.