कासा बाजारपेठ अतिक्रमणमुक्त
वाहतूक कोंडीमुळे ग्रामपंचायतीची कारवाई
कासा, ता. २१ (बातमीदार)ः वाढत्या अतिक्रमणामुळे डहाणू-नाशिक राज्यमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामपंचायत, पोलिस प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई केली.
कासा बाजारपेठ महत्त्वाच्या राज्यमार्गावर असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेक दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांसमोर जाहिरात फलक, विविध वस्तू तसेच हातगाड्या रस्त्यावर मांडल्याने रस्त्याची रुंदी कमी होत होती. याशिवाय रस्त्यालगत अनियमितपणे उभी केली जाणारी वाहनांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. परिणामी, सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने यापूर्वीही संबंधित दुकानदारांना अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर शुक्रवारी दुपारी बाजारपेठेतील टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.