वणव्यांमुळे जंगले होरपळली
मनोर परिसरातील जैवविविधतेचे नुकसान
मनोर, ता. २१ ः पालघर जिल्ह्यातील मनोर वन परिक्षेत्रात आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. टाकमाईदेवी डोंगर परिसरात लागलेला वणवा वेगाने पसरत असून, टेन, टाकवहाल तसेच सावरखंड ग्रामपंचायत हद्दीतील जंगले होरपळली आहेत.
सद्यःस्थितीत तापमानाचा पारा वाढला आहे. जोरदार वाऱ्यामुळे आगीची तीव्रता वाढत असल्यामुळे वणवा नियंत्रणात आणणे कठीण ठरत आहे. वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अत्याधुनिक साधन सामग्रीचा अभाव असल्यामुळे आग विझवण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. डोंगरमाथ्यावरील आग हळूहळू पायथ्याच्या भागाकडे सरकत असून टेन, टाकवहाल, सावरखंड ग्रामपंचायत हद्दीतील जंगलातील झाडे, वनस्पतीसह जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.
-------------------------------
यंत्रणेचा अभाव
जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी जाळ रेषा तसेच अन्य उपाययोजनांसाठी वन विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतरही जंगलाला लागणारे वणवे रोखण्यात अपयश येत आहे. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडे आधुनिक यंत्रणा नसल्याने शेकडो हेक्टर जंगल जळून खाक होत आहे. त्यामुळे वणव्यांवर नियंत्रणासाठी पर्यावरण रक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.