मुंबई

१२ वर्षे उलटूनही कोपरी प्रसूतीगृहाच्या समस्या सुटेना

CD

कोपरी प्रसूतिगृहाचा वनवास संपेना
१८ खाटांचा नवजात शिशू कक्ष बंद; १२ वर्षांपासून सुविधांची प्रतीक्षा

ठाणे, ता. २१ महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याचा दावा केला जात असला तरी कोपरी येथील शेठ लखीमचंद फतीचंद प्रसूतिगृहाची स्थिती मात्र दिव्याखाली अंधार अशीच आहे. गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही येथे पूर्णवेळ डॉक्टरांची कमतरता असून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला नवजात शिशू कक्ष उद्‍घाटनाअभावी धूळखात पडल्याची गंभीर बाब महासभेत समोर आली आहे.

ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत मानद डॉक्टरांच्या नियुक्तीचा विषय चर्चेला आला असता, नगरसेविका मालती पाटील यांनी कोपरी प्रसूतिगृहातील समस्यांचा पाढा वाचला. या प्रसूतिगृहात सध्या केवळ सकाळच्या सत्रातच सीझर शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या वेळी तातडीची शस्त्रक्रिया लागल्यास गर्भवती महिलांना थेट कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत असून, दोन्ही सत्रांत डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रसूतिगृहाच्या इमारतीत नवजात बालकांसाठी १८ खाटांचा सुसज्ज एसएनसीयू विभाग तयार करण्यात आला आहे; मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हा विभाग अद्याप कार्यान्वित झालेला नाही. परिणामी कोपरीमध्ये जन्मलेल्या ज्या बालकांना तातडीच्या उपचारांची गरज असते, त्यांना उपचारांसाठी कळव्याला पाठवावे लागते. प्रवासाच्या या धावपळीत नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरसेवक विकास रेपाळे यांनीही या प्रसूतिगृहात २४ तास सेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.

एप्रिलमध्ये विभाग सुरू होणार
तक्रारींवर उत्तर देताना पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले, की कोपरी प्रसूतिगृहात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच १८ खाटांचा एसएनसीयू विभाग बाह्य संस्थेच्या (आउटसोर्सिंग) माध्यमातून चालवला जाणार असून, त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

SCROLL FOR NEXT