मुंबई

भिवंडीत ४ लाखांचा गांजा जप्त

CD

भिवंडीत चार लाखांचा गांजा जप्त
निजामपुरा पोलिसांची धडक कारवाई

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) ः शहरात बेकायदा गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका सराईताला अटक करण्यात निजामपुरा पोलिसांना यश आले आहे. कुलदीप बच्चू सिंग (४६, रा. मिठपाडा, शेलार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चार लाख २७ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

मिठपाडा परिसरात राहणारा कुलदीप हा गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी बुधवारी (ता. १८) संगमपाडा येथील गाजेंगी हॉलजवळ सापळा रचून कुलदीपला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान घरातून आठ किलो १४६ ग्रॅम वजनाचा ओलसर, हिरवट रंगाचा गांजा आढळून आला.

गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळावरून गांजासह मोबाईल फोन आणि आधार कार्ड जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई भावेश घरत यांच्या फिर्यादीवरून निजामपुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

SCROLL FOR NEXT