मुंबई

वसईकरांनी केली नववर्षाला केली प्रार्थना

CD

युद्ध थांबू दे, जगात शांतता लाभो
वसईकरांनी केली नववर्षाला प्रार्थना

वसई, ता. २१ (बातमीदार) : वसई तालुक्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पारंपरिक वेशभूषा, नववर्षानिमित्त स्वागतयात्रा, ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा आवाज वसईनगरीत निनादत होता. वसई साईनगर येथे विविध देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम साऱ्यांना होत असल्याने ‘हे युद्ध थांबू दे व जगात शांतता लाभो’ अशी प्रार्थना नववर्षाला गुढीसमोर करण्यात आली.
या वेळी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक चंद्रशेखर धुरी, शिवसेनेचे जिल्हा सचिव राजाराम बाबर, सुभाष विश्वासराव, जयराम राणे, गोपाळ गावडे, उमेश कामत, संजय कौशल, विलास बिर्जे, प्रशांत कडुलकर, भाजपचे कल्पेश चौहान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नगरसेवक चंद्रशेखर धूरी यांच्या हस्ते गुढी पूजन, पंचांग पूजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी या वेळी गुढी पूजन व नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, तर मानव मंदिर या ठिकाणी बहुजन बिकास आघाडीचे प्रदीप विचारे यांनी आपल्या कुटुंबासह गुढी उभारली. या वेळी माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, माजी सभापती वृंदेश पाटील, कार्यालय समन्वयक विजय वर्तक, नगरसेवक कल्पेश मानकर, नगरसेविका प्रमिला पाटील, आरोग्य समितीचे माजी सभापती राजेंद्र कांबळी, रामाशंकर मिश्रा, समाजसेवक प्रवीण नलावडे यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.
गुढीपाडवा सोहळा यशस्वी करण्यासाठी अक्षय वधानी, हाजी पटेल, संजीव होणंखांदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
----
आकर्षक रांगोळीचा साज
विविध ठिकाणी आयोजित केलेल्या गुढीपाडव्याला विविध रंगाच्या रांगोळीचे दर्शन घडले. नववर्ष स्वागत उत्कृष्ट रंगोळीतून साकारण्यात आले होते. वसई (पश्चिम) येथे मोठ्या आकाराची रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
------
वसई : साईनगर येथे गुढीपाडवानिमित्त जगातील युद्ध थांबावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

SCROLL FOR NEXT