सातवीचे विद्यार्थी झाले शिक्षक
रानवली जिल्हा परिषद शाळेत आगळावेगळा उपक्रम
श्रीवर्धन, ता. २१ (वार्ताहर) ः रानवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकेची भूमिका पार पाडत पहिली ते सहावीला शिक्षणाचे धडे दिले. सातवीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त हा आगळा-वेगळा उपक्रम बुधवारी (ता. १८) शाळेत राबविण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला. सातवीचे सहा विद्यार्थी शिक्षक झाले होते.
हा कार्यक्रम सरपंच सुरेश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कृणाली अडखळे, उपाध्यक्षा भाग्यश्री पोतदार, समिती सदस्या मानसी काप हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी पहिली ते सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सातवीच्या वर्गातील मुलांबरोबर आलेले अनुभव सांगितले. उपशिक्षिका मानसी माळवदे व उपशिक्षक नीलेश श्रीवर्धनकर यांनी मनोगत व्यक्त केले. आपली कला दाखवा आणि आपले स्थान निश्चित करा. कारण हे युग स्पर्धेचे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक भिकू पांगारकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर रानवली गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे मत सुरेश मांडवकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.