मुंबई

कुर्ला नववर्ष यात्रेत ‘स्वदेशी’चा जागर

CD

कुर्ला नववर्ष यात्रेत ‘स्वदेशी’चा जागर
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) : कुर्ला (पश्चिम) येथे आयोजित नववर्ष यात्रेत यंदा ‘स्वदेशी आचार-विचार-प्रचार’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली. स्वदेशी वस्तूंचा वापर, स्वभाषेचे जतन, पारंपरिक वेशभूषा व खाद्यसंस्कृतीला प्राधान्य, तसेच भारतीय संस्कार आणि पर्यटनस्थळांना प्रोत्साहन देण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.
भारत नाका येथे स्वदेशी संकल्पनेवर आधारित भव्य व आकर्षक देखावा उभारण्यात आला होता. यात्रेत विविध राज्यांतील पारंपरिक वेशभूषेत लहान मुले, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता सर्वेश्वर मंदिर, शिक्षक नगर, जय भवानी चौक आणि गौरीशंकर मंदिर या चार ठिकाणांहून यात्रांना प्रारंभ झाला. भारत नाका येथे सर्व कुर्लेकर एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामूहिक गायन करून मानवंदना देण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शिवकालीन शस्त्रकला, लेझीम, तसेच लहान मुला-मुलींचे पिरॅमिड यांसारख्या विविध प्रत्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अखेरीस जागृत विनायक मंदिर येथे महाआरतीने यात्रेची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT