मुंबई

ई-चलानच्या संदेशामुळे गुन्ह्याचा उलगडा

CD

उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : एका साध्या ई-चलानमुळे उलगडलेला थरारक गुन्हा सध्या उल्हासनगरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. वाहतूक नियमभंगावर कारवाई करताना पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईचा संदेश थेट गाडीमालकापर्यंत पोहोचला आणि तिथूनच चोरीच्या दुचाकीचा धागा सापडला. गोव्यातील दारूच्या नशेत झालेल्या वादातून दुचाकीचोरी करून आरोपीने शेकडो किलोमीटरचा प्रवास केला होता. मात्र, पोलिस पथकाच्या सतर्कतेमुळे आरोपीचा पर्दाफाश झाला. दरम्यान, अटक टाळण्यासाठी आरोपीने पोलिसांवरच हल्ला केल्याने या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे.
उल्हासनगर वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संतोष भोईर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह बिलागेट ते दत्तवाडी रोड परिसरात वाहतूक नियंत्रणाची नियमित मोहीम राबवत होते. रस्त्याच्या दुतर्फा चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करताना त्यांनी दुचाकीवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा संदेश संबंधित वाहनाच्या मालक ओंकार बबन भरडे (रा. कोल्हापूर) यांच्या मोबाईलवर पोहोचला. संदेश मिळताच भरडे यांनी तत्काळ वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत संबंधित दुचाकी गोवा येथून चोरीला गेल्याची माहिती दिली. यानंतर नियंत्रण कक्षाकडून ही माहिती उल्हासनगर वाहतूक शाखेकडे पाठविण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोईर आणि वॉर्डन बबन उज्जैनकर यांनी तत्काळ कारवाई करत संशयित दुचाकीचा शोध सुरू केला.

ओळखीनंतर चोरी
ओंकार भरडे आणि लक्ष्मण घुडे (वय ३०, रा. सरळगाव, ता. मुरबाड) यांची ओळख गोव्यात झाली होती. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतापलेल्या घुडेंने भरडे यांची दुचाकी परवानगीशिवाय घेऊन पलायन केले. आरोपीने ही चोरीची दुचाकी वापरून गोवा ते मुरबाड असा लांब प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले.


थरारक पाठलाग
अंबिका देशी बारसमोरील शिव रोड परिसरात आरोपीला गाठले. त्याला थांबवून चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. उलट त्याने दुचाकी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करताना आरोपीने पोलिस लाईन परिसरात प्लॅस्टिकची खुर्ची फेकून भोईर यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये त्यांच्या कपाळाला दुखापत झाली. तरीही पोलिसांनी धैर्य आणि तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. ई-चलान प्रणालीद्वारे तपासणी केली असता दुचाकीचा मूळ मालक ओंकार भरडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गाडी चोरीला गेल्याची खात्री पटली, अशी माहिती पोलिसांनी दिली.


आरोपीवर २६ गुन्हे दाखल
आरोपी लक्ष्मण तुकाराम घुडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल २६ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी आठ ते १० गुन्ह्यांमध्ये हा वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी दिली. ठाणे जिल्ह्यासह परिसरात सक्रिय असलेल्या या आरोपीने यापूर्वीही अनेकदा पोलिसांना चकवा दिल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, उल्हासनगर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. याप्रकरणी लक्ष्मण घुडेविरुद्ध चोरी आणि शासकीय कर्तव्यात अडथळा आणून पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा गुन्हा उघडकीस आल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT