भविष्यातील आव्हानांच्या सामन्यासाठी सज्ज राहूया : पी. पी. बारदेशकर
सुरक्षा सप्ताहाची सांगता दिमाखदार, पथनाट्य ठरले प्रभावी
रोहा, ता. २१ (बातमीदार) : औद्योगिक क्षेत्रातही रोज घडणाऱ्या उलथापालथी, युद्धजन्य परिस्थिती स्वीकारत मार्ग काढावा लागणार आहे. अशा मोठ्या संकटात आपली विविध स्वरूपाची बांधिलकी अधिक सक्षम ठरायला हवी. कामगार क्षेत्र म्हणून जबाबदारी वाढत आहे. सुरक्षा महत्त्वाची आहे. अपघाती घटना, आगी का लागतात याची मीमांसा व्हायला हवी. एकंदर भविष्यातील आव्हानांच्या सामन्यासाठी सज्ज राहू, या सुरक्षा आपल्या हाती आहे, असे मार्गदर्शन उद्योजक, आरआयएचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांनी उपस्थित कंपन्यांचे अधिकारी, कामगारांना केले.
धाटाव येथे बुधवारी ५५व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारोह दिमाखात साजरा झाला. कामगार व कंपन्या सुरक्षा विषयांवरील पथनाट्य सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरल्याचे अधोरेखित झाले. रोहा इंडस्ट्रीयल असो, म्युच्युअल अँड रिस्पॉन्स ग्रुप, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च ते ११ मार्च राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा झाला. या वेळी अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच पथनाट्य व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या वेळी आरआयए सेफ्टी अवॉर्ड स्पर्धा घेण्यात आली.
बक्षीस वितरण व मार्गदर्शन कार्यक्रमाला आरआयएचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर, दयानंद नांदगावकर, एफडीसीचे साईड प्रमुख नाथासाहेब कोळेकर, एक्सेल इंडस्ट्रीजचे प्रमुख नीरजकुमार मिश्रा, अनेक प्रयोग कंपनीचे प्रसाद देशमुख, रोहा डायकेम कंपनीचे मुरगन, मार्गचे चीफ सुदाम करपे, एलपीचे राजेश खांडेकर, माजी चीफ को- आॅर्डिनेटर प्रकाश शेटे, मार्गचे प्रतिनिधी राजेश हजारे, अरुण माने, वैभव नाईक, डॉ. शैलेश नकाते, पत्रकार राजेंद्र जाधव, राजीव पडवळ, भाऊसाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते. सुरक्षा जनजागृती भित्तीपत्रके, शून्य अपघात नियंत्रण कंपन्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
फोटो कॅप्शन : धाटाव येथे सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करताना रोहा इंडस्ट्रिअल असोसिएशन अध्यक्ष पी. पी. बारदशकर आणि उपस्थित मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.