मुंबई

श्री राम सेवा मंडळाच्या वतीने श्री राम जन्मोत्सव

CD

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : शहरातील श्री राम सेवा मंडळ, कचौरे यांच्या वतीने श्री राम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (ता. २६) होणार आहे. यंदा या उत्सवाचे २४ वे वर्ष असून, स्थापनेपासूनची परंपरा कायम राखत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवारी भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्थानिक भाविक, विविध मंडळे आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले. श्री राम जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम गुरुवारी (ता. २६) श्री शंकर मंदिर, श्रीकृष्ण नगर, पत्रीपूल, कचौरे (पूर्व) येथे होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ४ वाजता श्री राम रथयात्रा, सायंकाळी ५.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रामनाम महायज्ञ तसेच महाप्रसाद असणार आहे. या वेळी अयोध्या धाम येथील ज्योतिषाचार्य कथावाचक नीलम शुक्ला महाराज यांच्या श्री राम कथेचेही आयोजन केले आहे. उत्सवानिमित्त सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दल कल्याण जिल्ह्याचे सहसंयोजक राजन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष अतिश चौधरी, स्वागताध्यक्ष नगरसेविका रेखा चौधरी तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT