मुंबई

जोगेश्वरीत सीसीटीव्ही ठप्प; चोरटे बिनधास्त

CD

जोगेश्वरीत सीसीटीव्ही ठप्प; चोरटे बिनधास्त
वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण
जोगेश्‍वरी, ता. २१ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदयनगर मार्गावरील एमएचबी कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी चोरी व दुकानफोडीच्या घटनांत वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लाखो रुपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी निष्क्रिय असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे.
एमएचबी कॉलनी क्रमांक १५ मधील रहिवासी मनी थॉमस यांची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता घरासमोर उभी करण्यात आली होती. मात्र, सकाळी ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर संपर्क साधून मेघवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदवली. याच परिसरातील कोकण नगर भागातही एका महिलेची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र, संबंधित वाहन दोन तासांत सापडल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एमएचबी कॉलनी क्र. ३ मधील एका दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी बरण्यांतील साहित्य व गल्ल्यातील रोकड लंपास केली. तसेच एका बिडी शॉपमधील माल चोरीला गेला. मेघवाडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक इंद्रजीत नेमाने यांनी सांगितले की, “या भागात चोरीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांची गस्त सुरू आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गस्त आणखी वाढवण्यात येणार आहे.” तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी अक्षय सातपुते यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर बतुल्ला व स्थानिक नागरिक कृष्णा कोकाटे यांनीही यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

'पुष्पा २' मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप होतोय... अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली- मला खूप वाईट...

SCROLL FOR NEXT