मुंबई

जव्हार-मोखाड्यात टँकरच्या फेऱ्या

CD

जव्हार-मोखाड्यात टँकरच्या फेऱ्या
उन्हाची तीव्रता वाढल्याने १० पाड्यांमध्ये पाणीटंचाई
जव्हार, ता.२१ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यातील दहा गावांमध्ये ६ टँकरद्वारे १० ते १२ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यास पुढील दोन महिन्यांत टंचाईग्रस्त पाड्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जव्हार-मोखाडा परिसरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधींच्या विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनमुळे काही प्रमाणात परिस्थिती सुधारली असली तरी पाणीटंचाईचे पूर्णपणे उच्चाटन झाल्याचे चित्र अद्याप दिसून येत नाही. जिल्ह्यात सध्या एकूण १२ पाड्यांमध्ये टंचाई असून त्यापैकी जव्हार तालुक्यात सर्वाधिक ६, मोखाडा तालुक्यात ४ आणि वाडा तालुक्यात २ पाडे टंचाईग्रस्त आहेत.मोखाडा तालुक्यातील धामोडी गोळीचा पाडा, डोंगरवाडी, हेदवाडी, जव्हार तालुक्यातील रीठीपाडा, सागपानी, काळीधोंड, कुंडाचापाडा, खरंबा, तळ्याचा पाडा या पाड्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या भागातील सुमारे ६ हजार ६९१ लोकसंख्या व १ हजार ९७४ पशुधनाची तहान टँकरवर अवलंबून आहे.
-----------------------------
ग्रामस्थांची पायपीट
काही ठिकाणी फेब्रुवारीतच टँकर सुरू करावे लागले आहेत. टँकरचे पाणी गावापासून दूर असलेल्या विहिरींमध्ये सोडले जात असल्याने महिला, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकांना हातातील कामे सोडून पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT