मुंबई

मेर्दीत महिला सक्षमीकरणाचा जल्लोष

CD

टोकावडे, ता. २१ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत मुरबाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मेर्दी येथे वनवासी संवाद ट्रस्ट, कल्याण आणि शांताई शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व गुढीपाडव्यानिमित्त भव्य महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सुमारे ३०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनवासी संवाद ट्रस्टचे संस्थापक बाबा जोशी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाषआप्पा घरत, गोविंद भला, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, माजी उपसभापती अरुणाताई खाकर, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ खाकर, खुटल (बा.) सरपंच माधुरी शेटे, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथील डॉ. तेजश्री घोटकर व त्यांचे कर्मचारी तसेच शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल, आळेफाटा येथील डॉ. शिवाजी खेमनर व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करत त्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला. विशेष कार्य करणाऱ्या महिला व मुलींचा सत्कार करण्यात आला. यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू-चमचा यांसारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या, तर मुलींच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. या वेळी मोफत आरोग्य शिबिरही झाले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोरोशी व शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल, आळेफाटा यांच्या सहकार्याने नागरिकांची तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT