मुंबई

पनवेलमध्ये रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांवर बैठक

CD

पनवेल, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय भवनामध्ये बैठक घेण्यात आली. यादरम्यान दुकानदारांनी त्यांच्या अडचणी व समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वांनी मिळून रास्तभाव दुकानदारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. विशेषतः वितरण प्रक्रियेमधील अडथळे, तांत्रिक अडचणी, अनियमित पुरवठा, तसेच प्रशासनाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्न यावर विचारमंथन करण्यात आले. दुकानदारांनी आपल्या मागण्या मांडताना सरकारकडून अधिक सहकार्य मिळावे, तसेच कार्यप्रणाली अधिक सुलभ करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर नागरिकांना वेळेवर व सुरळीत अन्नधान्य वितरण करता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

प्रशासनाच्या वतीने यावर सकारात्मक भूमिका घेत दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले. सामान्य नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळावी आणि रास्तभाव दुकानदारांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीमुळे दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

T20 Squad: 501 धावा, 28 विकेट्स, 732 रन्स... तरीही या तीन मॅच विनर्सना टीम इंडियात जागा नाही; BCCI चा नेमका प्लॅन काय?"

Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Latest Marathi News Live Update : खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाण्यात दाखल; पाणीटंचाईवर मोठा दिलासा

IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

SCROLL FOR NEXT