केंद्रीय राखीव पोलिस दल दिन उत्साहात
खारघर, ता. २१ (बातमीदार) : तळोजा येथील १०२ बटालियन, शीघ्र कृती दल येथे केंद्रीय राखीव पोलिस दल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुंबई शीघ्र कृती दलाचे उपमहानिरीक्षक रवी गोपाल वर्मा उपस्थित होते. त्यांना पोलिस जवानांकडून मानवंदना देण्यात आली.
या वेळी १०२ बटालियनचे कमांडर सुशांत कुमार प्रधान, द्वितीय कमान अधिकारी प्रेम कुमार, तसेच रेंज मुंबई व बटालियनमधील सर्व राजपत्रित अधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने जवान उपस्थित होते.
उपस्थित जवानांना मार्गदर्शन करताना वर्मा यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल दिनाचे महत्त्व सांगितले. तर यावेळी कमांडर सुशांत कुमार प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सैनिक संमेलन’ पार पडले. या वेळी पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.