कुक्कुटपालन व्यवसायिकांना कृषी समकक्ष दर्जाच्या सुविधा तातडीने द्या ः अनिल खामकर
पेण, ता. २१ (वार्ताहर) : राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन व्यावसायिकांना कृषी समकक्ष दर्जा व कृषी समतुल्य सर्व सुविधा देण्याचे विधीमंडळ सभागृहात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये असंतोष पसरला आहे. शासनाने या सुविधा तात्काळ द्याव्यात, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पोल्ट्री योद्धा राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल खामकर यांनी शुक्रवारी (ता. २०) दिला आहे.
शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे पालन करणे संबंधित प्रशासनाचे काम असून त्यानुसार कुक्कुटपालन व्यावसायिकांना सुविधा पुरवणे गरजेचे आहे. परंतु, ही सुविधा मिळत नसल्याने व्यावसायिकांमध्ये असंतोष पसरत आहे. एकीकडे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसाय दुर्बल घटकांतील व्यक्तीपर्यंत पोहोचत असतानाही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय मात्र शेतकऱ्यांना सोयीसुविधा देण्याबाबत दुर्लक्ष करत असल्याचे खामकर म्हणाले आहेत. यामुळे शासनाने सोयी-सुविधा तात्काळ द्याव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अनिल खामकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.