मुंबई

ऐरोलीत पादचारी पूल उभारण्याची मागणी

CD

ऐरोलीत पादचारी पूल उभारण्याची मागणी
येणाऱ्या सर्वसाधारण सभेत अशोक पाटील मांडणार मुद्दा
वाशी, ता. २१ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर १० येथील ‘गरम मसाला’ परिसर ते सेक्टर १५ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहेत. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने पादचारी पूल उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अशोक पाटील हे सर्वसाधारण सभेत यासाठी आवश्यक सर्वेक्षण करून लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करणार आहेत. या पुलामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने ये-जा करता येईल, तसेच संभाव्य अपघातांना आळा बसण्यास मदत होईल. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा ऐरोलीकरांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT