मुंबई

भिवंडीत रमजान ईद साजरी

CD

भिवंडीत रमजान ईदनिमित्त बंधुभावाचे दर्शन
मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा; पोलिसाकडून गुलाबाचे फूल देऊन स्वागत

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि परिसरात आज रमजान ईद अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर आलेल्या या सणानिमित्त शहरातील विविध मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली आणि एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळपासूनच शहरातील शांतीनगर, भोईवाडा, गैबी नगर, पटेल नगर, वंजारपाटी नाका, इदगाह मैदान, निजामपुरा, दर्गा रोड आणि कोटरगेट मशीद या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नमाजसाठी गर्दी केली होती. नमाजानंतर घराघरात शिरखुरमा आणि विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेत हा सण साजरा करण्यात आला. या आनंदाच्या सोहळ्यात महापौर नारायण चौधरी, उपमहापौर तारीक मोमीन, माजी खासदार सुरेश टावरे, आमदार महेश चौगुले, आमदार रईस शेख, माजी आमदार रशिद ताहीर मोमीन यांच्यासह अनेक मान्यवरांनी विविध मशिदींना भेटी देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

शांतता आणि सुव्यवस्थेसाठी शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मशिदीबाहेर नमाज संपल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबणीवर, राज्यपालांच्या भेटीत काय घडलं?

Thane: ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीच संकट, 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद; हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचा निर्णय

Nagpur Tehsildar Attack : नागपुरात तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं अन्... "कायदा आता माफियांच्या दादागिरीने चालतोय का?" वडेट्टीवारांचा सवाल

Bank Closed: सलग 4 दिवस बँका बंद राहणार? SBI बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप!

Alandi Palakhi: आळंदी देवस्थान आक्रमक भूमिकेत; पुणे मुक्कामाबाबत अंतिम निर्णय १३ मे नंतर, प्रशासन-देवस्थान समन्वयानंतर वेळापत्रक जाहीर होणार!

SCROLL FOR NEXT