मुंबई

थकबाकीमुळे सील झालेले राज सिनेमागृह पुन्हा सुरू

CD

राजनोवा सिनेमागृह पुन्हा सुरू
नगरपरिषदेकडून थकबाकी भरण्यास मुदत
कर्जत, ता. २१ (बातमीदार) ः कर्जत नगरपरिषदेच्या मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सील करण्यात आलेले राजनोवा सिनेमागृह शनिवारी (ता. २१) पुन्हा सुरू करण्यात आले. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या मध्यस्थीने थकबाकी भरण्यासाठी मुदत दिल्याने प्रशासनाने हे सील हटवले आहे.
राजनोवा सिनेमागृहावर ५० लाख रुपयांच्या थकबाकीमुळे बुधवारी (ता. १८) नगरपरिषदेच्या पथकाने या सिनेमागृहाचे बुकिंग कार्यालय आणि मुख्य दरवाजा सील केला होता. यामुळे धुरंदर २ या चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग केलेल्या प्रेक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. शहरातील करमणुकीचे एकमेव साधन बंद झाल्याने चित्रपटप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील आणि नगरसेवक महेंद्र चंदन यांनी शनिवारी (ता. २१) मध्यस्थी करत तोडगा काढला. नगरपरिषदेकडून सिनेमागृह मालकाला थकबाकी भरण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सील हटवून सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यावेळी संतोष पाटील यांनी सांगितले की, शहरातील एकमेव सिनेमागृह बंद राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे तात्पुरता निर्णय घेत सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार
सिनेमागृहाचे मालक मोहन राज यांनी नगरपरिषदेचे कर निरीक्षक शशांक तळवटकर आणि शीतल सावंत यांच्यावर दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा केला. याची दखल घेत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीची नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT