मुंबई

सक्षम महिला,समाजासाठी कटिबद्‍ध

CD

सक्षम महिला, समाजासाठी कटिबद्ध
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे यांचे प्रतिपादन

पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः महिला सक्षमीकरणासाठी व सक्षम समाजासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे यांनी केले आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ममता म्हात्रे या २०१० पासून सामाजिक कार्यात सक्रिय असून २०२५ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतलेल्या त्या संवेदनशील, तत्पर आणि उत्तरदायी लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागात ओळखल्या जातात. ‘राजकारणापेक्षा समाजकारण’ या विचारसरणीवर विश्वास ठेवत त्यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची कार्यपद्धती अंगीकारली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी १५ वर्षांत विविध उपक्रम राबवून महिला बचत गटांना प्रोत्साहन, रोजगारनिर्मिती व व्यापारी-ग्राहक पेठांचे आयोजन केले आहे. आरोग्य क्षेत्रात मोफत तपासणी शिबिरे, थायरॉइड, तपासण्या, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषध वितरण यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी हजारो नागरिकांना लाभ दिला आहे. रोजगारनिर्मितीसाठी रायगड व नवी मुंबई परिसरात १०,००० हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण व क्रीडा क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी काम केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूरग्रस्त व आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करून त्यांनी संवेदनशील नेतृत्व दाखवले आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर तसेच माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या कार्याला बळ मिळाले आहे.

कोट :
महिला सक्षमीकरण, आरोग्य व रोजगारविषयक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी संकल्प करते. मिळालेल्या जबाबदारीचे संधीमध्ये रूपांतर करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून परिणामकारक काम करणार आहे.
- ममता प्रितम म्हात्रे,
सभापती, महिला-बालकल्याण समिती, पनवेल महापालिका

चौकट ः
पनवेल पालिकेत सभापतींची निवड
पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी समिती सभापतिपदी बबन नामदेव मुकादम तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी ममता प्रितम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित विशेष सभेत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रणजित यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे) होते. या वेळी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे तसेच महापालिका सचिव नानासाहेब कामठे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT